जळगाव.दि.26, भारत निवडणूक आयोगाकडील
11 जुलैच्या पत्रान्वये 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार
याद्यांचा दुसरा संक्षिप्त कार्यक्रम सध्या सुरू आहे. सदर कार्यक्रमानुसार 15 ते 30 जुलै 2019 या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत
27 व 28 जुलै या दिवशी मतदार नोंदणीचे विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
तरी सदर
मोहिमेत नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून व आपले नाव मतदार यादीत समाविष्ट नसल्यास
संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे नमुना क्रमांक 6 चा फार्म भरून देवून आपले
मतदार यादीत नाव समाविष्ट करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक
अधिकारी,जळगाव गोरक्ष गाडीलकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000
No comments:
Post a Comment