जळगाव, दि. 17 - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगावमार्फत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीने जिल्ह्यातील रोजगार व स्वयंरोजगारासाठी अधिक मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करुन अभ्यासक्रम राबविण्यासाठी कौशल्य विकास या जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजनेंतर्गत उमेदवारांसाठी मोफत अनिवासी कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.
याकरीता जिल्ह्यातील लाभ घेऊ इच्छुक उमेदवारांनी शासनाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या https://kaushalya.mahaswayam.gov.in वेबपोर्टलला भेट देवून समुपदेशन/प्रशिक्षण (Counselling/Training) मेनूतील Get Counseled मध्ये जावून ज्या क्षेत्रात प्रशिक्षण घेण्यास स्वारस्य आहे त्यांनी दिनांक 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत ऑनलाइन फॉर्म/माहिती भरुन नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार हा जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असावा. उमेदवाराचे वय 18 ते 45 वयोगटात असावे, प्रशिक्षणासाठी आवश्यक किमान शैक्षणिक पात्रताधारक असावा.
कौशल्य विकास प्रशिक्षणांमध्ये सेक्टर स्किल कौन्सिलचे-लॉजिस्टीक्स्, कन्स्ट्रक्शन, ॲपरल, इन्फ्रास्ट्रक्चर, लेदर, मिडीया ॲण्ड एन्टरटेनमेन्ट, टूरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी, इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रम, एनसीव्हीटीचे सिक्युरिटी, रिटेल, रेफ्रिजरेशन ॲण्ड एअर कंडीशनिंग, प्रॉडक्शन ॲण्ड मॅन्युफॅक्टरींग, मेडीकल ॲण्ड नरसिंग, इन्फरमेशन ॲण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजि, इन्शुरन्स, मिडीया, फॅशन डिझाईन, गारमेंट, फायर ॲण्ड सेफ्टी इंजिनियरींग, फॅब्रिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीकल, इंडस्ट्रियल इलेक्ट्रीकल, ऑटोमोटीव्ह रिपेअर आदि विविध रोजगारक्षम क्षेत्रासह जेम्स् ॲण्ड ज्वेलरी, पाईप मॅन्युफॅक्चरींग, प्लॅस्टीक प्रोसेसिंग, टूरिझम, ट्रॅव्हल, हॉस्पिटॅलिटी ॲण्ड ट्रेड, फूड प्रोसेसिंग क्षेत्रांतील अभ्यासक्रम राहणार असून उमेदवारांना संपूर्णपणे शासनामार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे.
त्याचप्रमाणे सेन्ट-ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, जळगावमार्फत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील युवक, युवतींना कृषि, उत्पादन, प्रक्रिया क्षेत्रातील अभ्यासक्रमात विविध विषयावर अल्पमुदतीचे उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत मोफत प्रशिक्षण राबविण्यात येतील. याशिवाय जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगावमार्फत एनसीव्हीटीचे अभ्यासक्रम राबविण्यात येतील.
लाभार्थी उमेदवारांना प्रशिक्षण विनाशुल्क दिले जाईल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर मूल्यमापन करुन प्रशिक्षणार्थ्यांना शासनाचे प्रमाणपत्र (SSC/NCVT/MSCVT) देऊन संबंधित प्रशिक्षण संस्थेमार्फत रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी पोर्टलवर मोफत नोंदणी करावी अथवा कार्यालयात येवून विहित फॉर्म भरुन द्यावा. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक 0257-2239605 क्रमांकावर संपर्क साधवा. असे आवाहन सहायक संचालक श्रीमती अनिसा तडवी यांनी केले आहे.
000

No comments:
Post a Comment