जळगाव, दि. 16 - पिकांवरील किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प सन 2019-2020 अंतर्गत महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ यांचेमार्फत आपत्कालीन परिस्थितीत कापूस, सोयाबीन, मका, व ज्वारी या पिकांवरील विविध किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डायमेथोएट 30 ईसी 17,500 लीटर व ॲझाडिरेक्टीन 1500 पीपीएम 19,500 लीटर या किटकनाशकांचा पुरवठा करण्यात येत आहे.
या किटकनाशकांचा पुरवठा महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाच्या अधिकृत वितरकामार्फत करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी किडींमार्फत आर्थिक नुकसान पातळी ओलांडली असेल अशा ठिकाणीच या किटकनाशकांचा पुरवठा 50 टक्के अनुदानावर करण्यात येणार आहे. डायमेथोएट सर्व अधिकृत डीलर यांचेकडे उपलब्ध असून ॲझारिरेक्टीनचा पुरवठा लवकरच होणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.
जिल्ह्यात तालुकानिहाय नेमलेले वितरकांची यादी
चाळीसगाव-भवानी केएसके, पाचोरा-महावीर अँड कंपनी आणि आदर्श के एसके, जामनेर-शेतकरी सहकारी संघ, जामनेर, भडगाव-गजेंद्र केएसके आणि भडगाव फ्रुटसेल सोसायटी, जळगाव-राठी ट्रेडर्स, भुसावळ-तालुका शेतकरी सहकारी संघ, भुसावळ डेपो-वरणगाव, यावल-खान्देश ट्रेडर्स, रावेर-तालुका कृषि अधिकारी, रावेर, मुक्ताईनगर-तालुका कृषि अधिकारी, मुक्ताईनगर, बोदवड-खंडेलवाल ॲग्रो एजन्सी, अमळनेर-अमळनेर सहकारी फळविक्री सोसायटी, अमळनेर, चोपडा-अग्रवाल ट्रेडींग सोसायटी , पारोळा-संदेश केएसके, एरंडोल-जाजु ॲग्रो सेल्स, धरणगाव-शहा एजन्सी याप्रमाणे वितरकांची नेमणूक केलेली आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी काही शंका अथवा अडचणी असल्यास नजीकच्या कृषि सहाय्यक/कृषि पर्यवेक्षक/मंडळ कृषि अधिकारी /तालुका कृषि अधिकारी यांचेशी सपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:
Post a Comment