जळगाव.दि.20
:- जिल्ह्यातील माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांना 2018-2019 या शैक्षणिक वर्षासाठी
देश व राज्याची प्रतिष्ठा वाढवतील अशा स्वरूपाचे लक्षणीय काम केलेल्यांना एकरकमी
10 हजार व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी रुपये 25 हजारचा विशेष गौरव पुरस्कार तसेच
इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डाच्या परीक्षेत 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून
उत्तीर्ण झालेल्या पाल्यांना एअर मार्शल व्ही. ए. पाटणकर विशेष गौरव पुरस्कार
सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यामार्फत दिला जातो.
तरी पात्र माजी सैनिक, पत्नी, पाल्य यांनी यासंधीचा लाभ घ्यावा व दिनांक 31
ऑगस्ट 2019 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांच्याकडे अर्ज सादर करावेत.
असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
00000
No comments:
Post a Comment