जळगाव,
दि.2- जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची सभा आज जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे
यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.याप्रसंगी जळगाव शहर महानगर पालिकेचे आयुक्त
डॉ. उदय टेकाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील,
जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, उप शिक्षणाधिकारी श्रीमती के.डी. चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती
सरला पाटील , पोलीस निरीक्षक आर.अे.चंदेल यांचेसह विविध विभागांचे अधिकारी
उपस्थित होते.
यावेळी
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी क्रीडा संकुलातील आवश्यक त्या दुरुस्त्या व
सुशोभिकरणाची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात. क्रीडा
संकुलाच्या कामात पारदर्शकता रहावी याकरीता करावयाची कामे आवश्यक ती कार्यवाही
पूर्ण करुनच करावीत. क्रीडा संकुलात बॅडमिंटन, बास्केटबॉलसाठी प्रशिक्षित प्रशिक्षक
नेमल्यास सर्व घटकांतील खेळाडूंना प्रशिक्षण मिळण्यास मदत होईल. यावेळी क्रीडा संकुलातील
गाळेधारकांच्या समस्या, अडीअडचणींवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
000
No comments:
Post a Comment