जळगाव
दि.1 :- हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या
जयंती निमित्ताने आज 1 जुलै रोजी जिल्हा प्रशासनातर्फे अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी
स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन
केले.
याप्रसंगी
निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, जिल्हा पुरवठा
अधिकारी विजय सुर्यवंशी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी शुभांगी भारदे, तहसिलदार प्रशांत
कुलकर्णी, तहसिलदार मिलींद कुलकर्णी, नायब
तहसिलदार विकास लाडवंजारी यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी
उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment