जळगाव, दि.५- जळगांव येथील जी. एस. मैदानाजवळील
मुलींचे वसतिगृह व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाजवळील सैनिकी मुलांचे वसतिगृहात आजी
व माजी सैनिकांच्या इयत्ता आठवी पासून पुढील विविध अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेत
असलेल्या मुलांना माफक शुल्क आकारून प्रवेश दिला जातो. सन २०१९-२० या शैक्षणिक
वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया १८ जुलै, २०१९
रोजी आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव
यांनी दिली आहे.
माजी
सैनिक विधवांच्या मुलांना निशुल्क प्रवेश दिला जाणार असून माजी सैनिकांच्या
मुलांना भोजन व इतर शुल्कामध्ये कपात करण्यात आली आहे. त्यानुसार शिपाई ते हवालदार
यांच्या मुलांसाठी सहाशे रुपये प्रतिमाह, जेसीओ यांच्या मुलांसाठी आठशे रुपये
प्रतिमाह, सैनिकी अधिकारी यांच्या मुलांसाठी एक हजार रुपये प्रतिमाह तसेच जागा
शिल्लक राहिल्यास इतर नागरिकांच्या मुलांसाठी १ हजार ८०० रुपये प्रतिमाह अशा माफक
दराप्रमाणे भोजन, निवास, सेवा यांच्या समावेशासह शुल्क आकारण्यात येणार आहे.
या
वसतिगृहात विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी विविध क्रिडा स्पर्धांचे
व सहलीचे आयोजन केले जाते. व्यायामशाळा व वाचनालयाची सुविधा सुध्दा उपलब्ध
आहे. वसतिगृहात कार्यरत कर्मचारी
मुख्यत्वेकरून सैन्य सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी/कर्मचारी असल्याने त्यांच्याकडून
वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना शिस्त तसेच योग्य मार्गदर्शनही केले जाते.
तरी
जळगांव जिल्हयातील आजी - माजी सैनिक तसेच माजी सैनिकांच्या पत्नी यांनी त्यांच्या
पाल्यांना प्रवेश मिळविण्यासाठी सैनिकी मुलांच्या वसतिगृहाचा लाभ घ्यावा. अधिक
माहितीसाठी श्री पी. आर. गरूड, वसतीगृह अधिक्षक मो. नं. ९९७५२०७०९७ व श्रीमती
अनिता पाटील, वसतीगृह अधिक्षिका मो. नं. ८७८८२४५२८२ तसेच दूरध्वनी क्र.
०२५७-२२३३०८८/२२४१४१४ वर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,
जळगांव यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment