Tuesday, 23 July 2019

लेखा लिपीक/लेखा परिक्षा लिपीक व कनिष्ठ लेखापाल /कनिष्ठ लेखा परिक्षक या पदांची गुणानुक्रमे तात्पुरत्या विचारधीन उमेदवारांची यादी घोषित


        जळगाव.दि.23, लेखा व कोषागारे मुंबई यांनी दि. 9 जानेवारी 2019 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीनुसार लेखा लिपीक, लेखा परिक्षा लिपीक व कनिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखा परिक्षक या गट ‘क’ संवर्गाचे भरतीच्या पुढील प्रक्रीये अंतर्गत परिक्षेचा निकाल www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. तसेच गुणानुक्रमे तात्पुरत्या विचारधीन उमेदवारांची यादी संचालक लेखा व कोषागारे, मुंबई यांच्या www.mahakosh.gov.in या संकेतस्थळावर employee corner_ Recruitment rule या टॅबवर आहे. त्यानुसार भरतीच्या पुढील प्रक्रीये अंतर्गत उमेदवारांची तपासणी 22 जुलै 2019 ते 29 जुलै 2019 या कालावधी दरम्यान कार्यालयीन वेळेत सहसंचालक लेखा व कोषागारे या विभागीय कार्यालयात होणार असल्याने संबंधित उमेदवारांनी सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्र.सि.पंडीत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                           *****

No comments:

Post a Comment