जळगाव.दि.26:- दुचाकी वाहन धारकांना आपल्या वाहनांकरीता आकर्षक किंवा
पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी उप प्रादेशिक कार्यालयात 29 व 30 जुलै या
दोन दिवसात सदर अर्ज दुपारी 4.00 वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील ,तसेच पसंती
क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहित केलेल्या शासकीय शुल्काचा
डी.डी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,जळगाव यांचे नावे काढावा तसेच ओळखपत्र आवश्यक असून अर्जासोबत जोडावे.विहीत
शुल्काच्या रकमेचा भरणा मालिका सुरू झाल्यावर व पसंतीचे नोंदणी क्रमांक प्राप्त करून घ्यावेत.
तसेच अशा आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरल्यावर वाहनाचे कागदपत्र तात्काळ सादर करणे
अनिवार्य राहिल. मालिका सुरू असताना वाहन -4 प्रणाली कार्यान्वीत झाल्यानंतर बंद
करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
अर्ज दिनांक
30 जुलै रोजी दुपारी 4.00 वाजेपर्यंत स्विकारले जातील.दुपारी 4.00 वाजता
कार्यालयात एकापेक्षा जास्त अर्ज आले किंवा कसे याची संबंधितांकडून चौकशी करावी.
एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या क्रमांकाच्या बाबतीत 31 जूलै राजी दुपारी 4.00
वाजेपर्यंत वाढीव शुल्काच्या डी.डी स्वतंत्र लिफाफ्यातून सादर करणे बंधनकारक
राहिल. 31 जुलै दुपारी 4.30 वाजता बंद लिफाफे उघडण्यात येतील व जास्त रकमचे धनादेश
सादर केलेल्या अर्जदारास सदर क्रमांक देण्यात येईल व उर्वरित धनादेश परत करण्यात
येतील.
तरी संबंधितांनी
या संधिचा लाभ घ्यावा असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,जळगाव यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment