जळगाव.दि.26, महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये अधिनियम,1967 व त्यांच्या
अंमलबजवाणीसाठी तयार करण्यात नियमांत सुधारणा करण्यात येणार आहेत त्या अशा 1) महाराष्ट्र सार्वजनिक
ग्रंथालये (सहायक अनुदान आणि इमारत व साधनसामग्री अनुदाने यासाठी मान्यता)
नियम,1970 (2) महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय संघ (सहायक अनुदानासाठी मान्यता
देणे) नियम 1971 (3) महाराट्र सार्वजनिक ग्रंथालये, राज्य ग्रंथालय परिषद व जिल्हा
ग्रंथालय समित्या (कामकाजाची कार्यपध्दती) नियम 1973 (4)महाराष्ट्र ग्रंथालयांना
(संशोधन व साहित्यिक परिसंस्थाची ग्रंथलये) सहायक अनुदानाकरीता मान्यता देण्याचे
नियम 1974 यामध्ये कालानुरूप सुधारणा करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
ग्रंथालय
चळवळीशी संबंधित लेखक,साहित्यिक ,वृत्तपत्र संपादक,मुद्रक,प्रकाशक,ग्रंथ
विक्रेते,शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सेवक, वाचक,व
सभासद, शैक्षणिक ग्रंथपाल, ग्रंथालय, संस्था, लोकप्रतिनिधी, महिला, महाविद्यालय/विद्यापीठीय
ग्रंथालय व माहितीशास्त्राचे प्राध्यापक,संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी
सर्वांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी
प्रस्तावित अधिनियम व नियमांत सुधारणा /बदल सुचवितांना त्याचे बाब निहाय सकारण व
योग्य समर्थन करणे आवश्यक आहे. तसेच सुधारणा /अभिप्राय /मत/सूचना इत्यादि विषयक
पत्रव्यवहार समक्ष /टपाल/ई-मेलद्वारा ग्रंथालय संचालनालनालयाच्या अधिपत्याखालील
जिल्हयाच्या ठिकाणी कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे 31
ऑगस्ट पर्यंत सादर करावेत. सविस्तर माहिती ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करून दिली आहे.असे अध्यक्ष महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम 1967 सुधारणा
समिती व प्र. ग्रंथालय संचालक गंथलये संचालनालय,मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्राकान्वये कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment