जळगाव दि.3:- शासकीय बहुउद्देशिय अपंग संमिश्र केंद्र,मेहरुण रोड,जळगाव या
संस्थेत 2019-2020 या शैक्षणिक वर्षाकरीता 6 ते 15 या वयोगटातील अंध, मुकबधीर,
अस्थिव्यंग मुलांना प्रवेशासाठीचे विहीत नमुन्यातील अर्ज दि. 1 जून 2019 पर्यंत
संमिश्र केंद्राच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. बिनचुकपणे भरलेले अर्ज 15 जून पर्यंत
संस्था कार्यालयात स्विकारण्यात येवून अर्ज प्राप्त उमेदवारांची जुन महिन्यात
वैद्यकीय तपासणीसाठी व पालकांशी चर्चा करण्यासाठी बोलवण्यात येईल. दुसऱ्या दिवशी
अंतिम यादी घोषीत केली जाईल असे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी यांनी एका
पत्रकान्वये कळविले आहे.
शासकीय बहुउद्देशिय अपंग
संमिश्र केंद्रामार्फत मोफत भोजन, निवास, गणवेश, अंथरूण-पांघरून, क्रमिक पुस्तके,
शालेय साहित्य, औषधोपचार, शालेय व कला शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे. उमेदवार हा
अंध, कर्णबधिर किंवा अस्थिव्यंग यापैकी एकाच प्रकारचे अपंगत्व असणारा आवश्यक आहे.
एकापेक्षा अधिक प्रकारचे अपंगत्व असणाऱ्या उमेदवाराने अर्ज करू नये, उमेदवारास
कोणताही संसर्गजन्य आजार नसावा. उमेदवारांनी अर्ज पाठवितांना अर्जासोबत
पुढीलप्रमाणे पत्रांच्या छायांकित प्रती पाठवाव्यात व प्रवेश घेतेवेळी मुळ
प्रमाणपत्र घेवून उपस्थित रहावे. आवश्यक
असणाऱ्या छायांकित प्रमाणपत्रांच्या प्रती याप्रमाणे- अपंगत्वाचे वैद्यकीय
प्रणापत्र (ऑनलाईन). जन्म दाखला, उत्पन्नाचा दाखला. मुलाचे अपंगत्व दिसेल असे 4
छायाचित्र, आधार कार्ड, रेशन कार्ड
इत्यादी मुळ प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
वरीलपैकी तीनही
अपंगत्वाचे प्रवर्गानुसार त्या-त्या विभागातील तज्ञांचा वैद्यकीय दाखला व
मुकबधिरांसाठी श्रवणालेख आवश्यक आहे. अस्थिव्यंग मुलांना शारिरीक पुनर्वसन हा
मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी प्रवेश दिला जाईल
व त्या कालावधीत त्यांना शालेय शिक्षण दिले जाईल. शारिरीक पुनर्वसन
झाल्यानंतर त्याचे पुढील वर्षी संस्थेतून नाव कमी करण्यात येईल याची संबंधित
उमेदवार व पालकांनी नोंद घ्यावी. संस्थेत प्रवेश दिल्यानंतर संस्थेचे नियमांचे
पालन करणे आवश्यक आहे. पूर्ण व बिनचुकपणे भरलेले अर्ज अधिक्षक, शासकीय बहुउद्देशिय
अपंग संमिश्र केंद्राकडे मुदतीत सादर करावेत असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी,
जिल्हा परिषद, जळगाव यांनी एका पत्रकान्वये आवाहन केले आहे.
० ० ० ०
No comments:
Post a Comment