जळगाव दि. २२ :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ साठी ०३ जळगाव व ०४ रावेर लोकसभा
मतदार संघासाठी आज सकाळी ७ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यत मतदान होणार आहे. जिल्ह्यात
३४ लाख ३१ हजार ४८५ मतदार असून त्यादृष्टीने प्रशासनामार्फत मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून यंत्रणा सज्ज आहे. या मतदानासाठी
दोन्ही लोकसभा मतदार संघातील निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांना मतदान साहित्यासह
आज सकाळीच आपआपल्या नियुक्तीच्या मतदान
केंद्राकडे रवाना करण्यात आले आहे.
आज
०३-जळगाव लोकसभा मतदार संघातील जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त राखीव
पथकांसह ३९३ पथके , जळगाव ग्रामीण
विधानसभा मतदार संघासाठी ३३६ पथके, अमळनेर
विधानसभा मतदार संघासाठी ३२३ पथके, एरंडोल विधानसभा मतदार संघासाठी ३९० पथके,
चाळीसगाव विधानसभा मतदार संघासाठी ३४१
पथके तर पाचोरा विधानसभा मतदार
संघासाठी ३३० पथके असे सहा विधानसभा मतदार संघासाठी एकुण २ हजार ०१३ पथके ईव्हीएम, व्हि व्हि पॅट व मतदान साहित्यासह पोलीस बंदोबस्तात नियुक्त मतदान
केंद्राकडे रवाना झाले आहेत.
०४
रावेर लोकसभा मतदार संघातील चोपडा विधानसभा मतदार संघासाठी ३२१ राखीव पथकासंह,
रावेर विधानसभा मतदार संघातील ३१९ पथके, भुसावळ विधानसभा मतदार संघासाठी ३१५ पथके,
जामनेर विधानसभा मतदार संघासाठी ३२८ पथके, मुक्तताईनगर विधानसभा मतदार
संघासाठी ३२१ पथके तर मलकापूर विधानसभा
मतदार संघासाठी ३०२ पथके असे सहा विधानसभा मतदार संघातील १ हजार ९०६ पथके मतदान
साहित्यसह रवाना झाले आहेत.
जळगाव
लोकसभा मतदार संघात १४ तर रावेर लोकसभा मतदार संघात १२ उमेदवार रिंगणात आहेत.
जिल्हयात १७ लाख १९ हजार ६६० पुरुष तर १६ लाख ३९ हजार ७३२ महिला तर ९३ इतर मतदार आहेत. जिल्हयात ७ हजार ९९२ सर्व्हिस मतदार आहेत.निवडणूक
कामासाठी नेमणूक असलेल्या १५ हजार २८७ मतदारांना टपाली मतपत्रिका तर ईटीपीबीएस प्रणालीद्वारे
७ हजार ६१९ मतदारांना मतपत्रिका
पाठविण्यात आल्या आहेत. जिल्हयात २ हजार १११ ठिकाणी ३ हजार ६१७ मतदान केंद्र आहेत.
या मतदान केंद्रावर २६ हजार १३६ अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात
लोकसभेच्या निवडणूका शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस अधिक्षक १,
अपर पोलीस अधिक्षक २, उपविभागीय पोलीस अधिकारी ११, पोलीस निरीक्षक २७, सहाय्यक
पोलीस निरिक्षक व पोलीस उप निरीक्षक १६४ , पोलीस शिपाई ४ हजार ४९४ तर १ हजार ३९२
होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्हयातील
३६२ मतदान केंद्राचे वेबकॉस्टिंग करण्यात येणार आहे. जिल्हयात ३६ मतदान
केंद्रे क्रिटीकल आहेत. एस आर पीचे ३ प्लॅटून , मध्यप्रदेश पोलीसांचे ३ प्लॅटून, रेल्वे पोलीसांचे १ प्लॅटून तैनात
करण्यात आले आहेत. जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी प्रत्येकी
एक सर्वसाधारण निरीक्षक, एक खर्च निरीक्षक तर एक पोलीस निरिक्षक व ११३ सुक्ष्म
निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील
जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हा निवडणुक
अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
००००
No comments:
Post a Comment