Wednesday, 10 April 2019

1 एप्रिल पासून (एसटी) विद्यार्थ्यांसाठी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तपासणी मोहीम सुरु



        जळगाव, दि.10-  नंदुरबार जात  पडताळणी समिती अंतर्गत नंदुरबार, धुळे व जळगाव हे तीन जिल्हे येतात.या तीनही जिल्ह्यातील अनुसूचित जमातीचे विद्यार्थ्यांकरीता सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षात ज्या शैक्षणिक प्रवेशाकरीता वैधता प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. अशा वैद्यकीय M.B.B.S., B.E. B.Sc (Agri) BVSC, BAMS, D. Ed,  B.Ed.  अभ्यासक्रमाकरीता तसेच CET, JEE, NEET च्या परीक्षेस बसलेल्या विदयार्थ्यांसाठी समिती कार्यालयाने दि. 01 एप्रिल, 2019 पासून विशेष मोहीम सुरु केली असल्यामुळे समिती कार्यालयात संपर्क कक्ष स्थापन करण्यात आले आहे. विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांनी कार्यालयात संपर्क साधतांना खालील बाबीची माहिती देणे अपेक्षित आहे.
            प्रकरण कार्यालयात दाखल केल्याची पावती, CET, JEE, NEET किंवा इतर आवश्यक प्रवेश पात्रता परीक्षेकरीता बसल्याची पावती, सादर केलेल्या पुराव्यांच्या मुळ प्रती सुद्दा शक्य असल्यास सोबत आणाव्यात. असे आवाहन बबीता गिरी, सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नंदुरबार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment