जळगाव, दि. 10:- लोकसभा मतदार संघ 03 - जळगाव व 04 -रावेर मधील मतदारांना
दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी होणाऱ्या मतदानासाठी मतदान करता यावे म्हणून महाराष्ट्र
शासनाने दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी 03-जळगाव
व 04-रावेर लोकसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
03-जळगाव व 04- रावेर मतदार संघाच्या
क्षेत्रातील जे मतदार कामासाठी मतदार संघाच्या बाहेर असतील त्यांना देखील सुट्टी लागु राहील. तसेच सदर सुट्टी राज्य शासन
व केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालय, सार्वजनिक उपक्रम व इतर प्रतिष्ठाण
यांना ही लागू राहील. असे डॉ. अविनाश ढाकणे
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले
आहे.
000
No comments:
Post a Comment