Tuesday, 9 April 2019

निवडणूक कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे







      जळगाव दि. 9 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावे व आदर्श आचारसंहितेने काटेकोरपणे पालन करावे अशा सुचना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 03 जळगाव, 04 रावेर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक विषयक विविध मुद्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्यासह केंद्रीय निवडणूक निरीक्षक सर्वश्री. डॉ. अजयकुमार, श्री.छोटे लाल पासी, श्री.असिम विक्रांत मिंज, श्री. मधुकर आनंद, श्री. वेणूधर गोडेसीसह  अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन.पाटील, मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाडे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, अपर पोलीस अधिकारी रोहित मतीन आदि उपस्थित होते.
            जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. ढाकणे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, निवडणूक कालावधीत सर्व यंत्रणांनी निवडणूक आयोगाने दिलेल्या नियमांचे पालन करुन काम करावे, निवडणूकीच्या कालावधीत सर्व चेक पोष्टवर व सीमावर्ती भागात सी.सी.टी.व्ही. बसविण्यात आले असून  चेक पोष्टवर एस.एस.टी व एफ.एस.सी. पथकांनी व पोलीस यंत्रणांनी बारकाईने लक्ष ठेवावे, व वाहनांची कडक तपासणी करावी. यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राहू द्यावा अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.
            डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, कम्युनिकेशन प्लॅन करतांना त्यात सर्व बाबीचा उल्लेख केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, निवडणूक कालावधीत नियंत्रणासाठी एस.एस.टी व एफ.एस.सी च्या 36 टिम मध्ये 288 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. आता उमेदवार निश्चित झाले असून यापुढे दोन्ही लोकसभा मतदार संघात विना परवानगी ध्वज व बॅनेर लावलेले वाहने प्रचार करत असतील अशा वाहन धारकांवर तातडीने केसेस दाखल करुन वाहने ताब्यात घ्यावत. निवडणूक होईपर्यत वाहने सोडू नयेत अशा सुचनाही त्यांना यावेळी दिल्या.
            डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, उमेदवाराने निवडणूक कालावधीत रोजचा खर्चचा अहवाल दररोज सादर करावा. यासाठी सहाय्यक निवडणूक खर्च निरीक्षकांनी उमेदवारांच्या खर्चावर गांभीर्याने नजर ठेवावी असेही त्यांनी सांगितले.
            ते पुढे म्हणाले की, उमेदवाराने निवडणूक कालावधीत प्रचारासाठी मैदान आरक्षित केले असेल तर त्या वेळेत उपलब्ध करुन द्यावे, परंतु एकच उमेदवार वारंवार मैदान आरक्षित करत असेल तर त्यांना मैदान उपलब्ध करुन देवू नये अशा सुचनाही त्यांनी केल्या.
            यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. अजयकुमार म्हणाले की, निवडणूक कालावधीत सर्व यंत्रणांनी गांभीर्याने कामे करावेत, यात प्रामुख्याने सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, कम्युनिकेशन प्लॅन, मतदान केंद्रे, नोडल अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, व्हिडिओ ग्राफर यांनी एकमेकांच्या संपर्कात राहून कामे करावेत असेही त्यांनी सांगितले.
            यावेळी केंद्रीय पोलीस निरीक्षक असिम मिंज मार्गदर्शन करतांना म्हणाले की, निवडणूक कालावधीत पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने नाका तपासणीवर मोठ्या प्रमाणात भर द्यावी व निवडणूक कालावधीत अवैध मद्य वाहतुक व मोठया रक्कमेची वाहतुक करणा-या गुन्हेगारांना वचक बसेल.  जास्तीत जास्त केसेस कशा दाखल केल्या जातील याकडे लक्ष द्यावे, अशा सुचनाही त्यांनी केल्या.
            यावेळी निवडणूक खर्च निरीक्षक श्री. मधुकर आनंद व वेणूकर गोडेसी यांनी सांगितले की, सर्व उमेदवारांनी निवडणूक आयोगांच्या नियमांची पालन करुन दररोज निवडणूक खर्चाची माहिती द्यावी, व सर्व उमेदवारांना समान न्याय देण्यासाठी यंत्रणांनी काम करावे, उमेदवारांच्या सभेचे सर्व रेकॉर्डिंग, व्हिडिओग्राफरने करावे, यामुळे उमेदवारांनी सभेसाठी किती खर्च केला हे लक्षात येते असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            या बैठकीस 03 जळगाव, 04 रावेर लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, उप विभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार, बीडीओ, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी, पोलीस निरीक्षक, नोडल अधिकारी उपस्थित होते.
000000

No comments:

Post a Comment