जळगाव दि. 10 :- लोकसभा सार्वत्रिक
निवडणूक 2019 च्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात लोकसभा निवडणूकी करिता करण्यात
आलेल्या पुर्वतयारीची माहिती देण्यासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची विशेष मुलाखत आज (11 रोजी) सकाळी
8.40 मि.नी. जळगाव आकाशवाणीच्या 963 केएचझेड वरुन प्रसारित करण्यात येणार आहे. ही
मुलाखत ज्येष्ठ उद्घोषक सतिष पप्पू यांनी घेतली आहे. जळगाव आकाशवाणी केंद्राच्या
कार्यक्षेत्रात येणाऱ्या जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, नाशिक या जिल्ह्यातील
श्रोते या मुलाखतीचा लाभ घेऊ शकतील.
00000
No comments:
Post a Comment