Monday, 1 April 2019

जळगाव लोकसभा मतदार संघात एक उमेदवारी अर्ज दाखल

  जळगाव, दि. 01 - लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज सादर करण्याच्या पाचव्या दिवशी (1 एप्रिल) 03-जळगाव लोकसभा मतदार संघात अपक्ष म्हणून ललीत गौरीशंकर शर्मा यांनी दोन उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेकडे दाखल केले. 
  03-जळगाव लोकसभा मतदार संघात आजपर्यंत चार उमेदवारांनी सात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी आज एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. 
                                                                     000

No comments:

Post a Comment