Monday, 15 April 2019

आचारसंहिता भंगाविषयीच्या तक्रारी सी-व्हिजिल ॲपवर नोंदविण्याचे आवाहन

       जळगाव, दि. 15 :- लोकसभा निवडणूका पारदर्शक व मुक्त वातावरणात  होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. लोकसभा निवडणूकी दरम्यान नागरिकांना आचारसंहितेबाबत असणाऱ्या तक्रारी नोंदविता याव्यात यासाठी सी-व्हिजिल ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनी आपल्या आचारसंहितेबाबतच्या काही तक्रारी असल्यास त्या सी- व्हिजिल ॲपवर नोंदवाव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
    
      नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा संपर्क कक्ष  स्थापन करण्यात आला आहे. जनतेला आचारसंहिता भंग विषयक तक्रारी करावयाच्या असल्यास त्यांनी सी- व्हिजिल ॲपवर कराव्यात. याकरिता नागरिकांना प्रथम आपल्या मोबाईलवर गुगल प्ले स्टोअरमधून अथवा ॲपल ॲप स्टोअरमधून सी- व्हिजिल ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. या ॲपवर आचारसंहिता भंग होत असल्याच्या घटनेचा लाईव्ह फोटो/ व्हिडीओ टाकून घटनेबाबतची सविस्तर माहिती द्यावी लागेल. तरी जनतेने आपल्या तक्रारी नोंदविण्यासाठी         सी- व्हिजिल ॲपचा वापर करावा. असे  जिल्हा संपर्क अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                        ० ० ० ०

No comments:

Post a Comment