जळगाव, दि. 30 - जिल्हा कौशल्य
विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व लेवा पाटीदार बिझीनेस
नेटवर्क यांचे संयुक्त विद्यमाने गाडेगांव येथील तोताराम महाराज समाधी कॅम्पस,
सुपीम इंडस्ट्रीज जवळ, जळगाव- औरंगाबाद
नॅशनल हायवे मु.पो. गाडेगाव ता. जामनेर, जि. जळगाव येथे दिनांक 5 मे, 2019 रोजी
सकाळी 8.30 ते दुपारी 2.30 या वेळेत युवक/युवतींसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात
आला आहे.
या मेळाव्यासाठी विविध खाजगी
आस्थापनांनी एकूण 300 रिक्तपदांची मागणी कळविलेली असून रिक्तपदांसाठी शैक्षणिक
पात्रता आय.टी.आय पास, डिप्लोमा व इंजिनियरींग पात्रता धारक अशी आहे.
उपस्थित राहणा-या उदयोजकांना विविध
रिक्तपदांसाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची असल्याने उमेदवारांनी स्वखर्चाने
मेळाव्यास उपस्थित रहावे. मेळाव्यास येतांना शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे,
बायोडाटा, पासपोर्ट फोटोसह 5 मे, 2019 रोजी ठिक 8.00 वाजता मु. पो. गाडेगाव, ता.
जामनेर जि. जळगाव येथे उपस्थित रहावे. नियेक्त्यांकडून देण्यात येणा-या वेतनाबाबत
व इतर सवलतीबाबत रोजगार मेळाव्याचे दिवशी संबंधित कंपनीचे अधिकारी/ प्रतिनिधी
माहिती देणार आहेत.
या
सुवर्ण संधीचा लाभ इच्छुक उमेदवारांनी घ्यावा, असे आवाहन श्रीमती अनिसा तडवी,
सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. तसेच रोजगार मेळाव्याच्या अधिक
माहितीसाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in वेबसाईटला भेट दयावी, असेही श्रीमती तडवी यांनी
एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment