जळगाव दि. 8 :- जळगाव लोकसभा मतदार संघाचे केंद्रीय
निवडणूक निरीक्षक सर्वश्री. डॉ.अजयकुमार, श्री.छोटे लाल पासी, श्री.असिम विक्रांत
मिंज यांनी आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील मिडीया कक्षास भेट दिली. यावेळी
त्यांच्यासोबत उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी
विलास बोडके, माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हा
माहिती अधिकारी श्री.
बोडके यांनी केंद्रीय निरीक्षकांना मिडीया कक्षातील कामकाजाची माहिती दिली.
याप्रसंगी डॉ. अजयकुमार यांनी निवडणूक
कालावधीतील वर्तमानपत्रातील जाहिराती, पेडन्यूज, सोशल मिडीया, आकाशवाणी, एफएम,
इलेक्ट्रॉनिक्स मिडीयावरील जाहिरात तसेच स्थानिक केबलवरुन प्रसारीत होणाऱ्या बातम्या
व जाहिरातीवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या
सूचना सर्व संबंधितांना दिल्यात. तसेच
पेडन्यूज आढळून आल्यास तात्काळ त्याची माहिती निवडणूक खर्च शाखेस देण्याचेही
निर्देश त्यांनी यावेळी दिले. जे उमेदवार त्यांचे प्रचार साहित्य माध्यम प्रमाणिकरण
व सनियंत्रण समितीकडून प्रमाणीत करुन न घेता प्रसारीत करतील त्यांना नोटीसा बजावण्याचे
निर्देशही त्यांनी यावेळी दिले. समितीकडे प्राप्त होणाऱ्या प्रचार साहित्य तात्काळ
तपासून प्रमाणित करुन देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.
000000
No comments:
Post a Comment