जळगाव, दि. 15- दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा, त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव व्हावी. यासाठी श्री. मुकुंद गोसावी, अध्यक्ष, मुक्ती फाउंडेशन, जळगाव, श्री. अत्ताफ शेख, अभिनेता, अहिराणी भाषा (खान्देश भाषा) मु.पो. धार, ता. एरंडोल, श्रीमती मिनाक्षीताई निकम, अध्यक्ष, स्वयंदिप फाऊंडेशन, चाळीसगाव यांची जिल्ह्याचे ऑयकॉन म्हणून नियुक्ती केली आहे.
निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकांमध्ये दिव्यांग व्यक्तींना विशेष व्यक्तींचा दर्जा दिलेला आहे. दिव्यांग व्यक्तींचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढावा याकरीता समाजातील प्रतिष्ठित दिव्यांग व्यक्तींना District Campus Ambassador अथवा District Icon म्हणून नियुक्त करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील प्रतिष्ठित दिव्यांग व्यक्तीं म्हणून त्यांची जिल्ह्याचे District Icon म्हणून नियुक्ती केली आहे.
या व्यक्तींनी समाजातील दिव्यांग मतदारांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविणेसाठी व त्यांना मुलभूत सुविधा उपलब्घ करुन देणेकामी District Icon म्हणून निवडणूक विभागास सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. ढाकणे यांनी केले आहे.
000

No comments:
Post a Comment