जळगाव, दि. 30 - राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी
डॉ. अविनाश ढाकणे यांनी तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष
गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे,
उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम
हुलवळे, तहसीदार (महसुल) मंदार कुलकर्णी, विकास लाडवंजारी यांचेसह अधिकारी, कर्मचारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांनीही तुकडोजी
महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून
अभिवादन केले.
000
No comments:
Post a Comment