जळगाव
दि.19 :- लोकसभा सार्वत्रिक
निवडणूक 2019 करीता जळगाव जिल्ह्यात 23 एप्रिल,2019 रोजी मतदान होणार आहे.
जिल्हादंडाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना
प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन मतदानाचे दिवशी जळगाव शहर व जिल्ह्यात
ज्या ठिकाणी आठवडे बाजार भरणार आहे. त्याठिकाणचे आठवडे बाजार इतर सोईच्या दिवशी
भरविण्याचे आदेश त्यांनी काढले आहे.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक निवडणूकीच्या
मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार भरणार असलेल्या गावांची/भागांची यादी खालील प्रमाणे
नमुद करण्यात आली आहे.
तालुका/नगरपरिषद आणि गावाचे नाव/भागाचे
नाव :- चोपडा- घोडगाव, चुंचाळे, चाळीसगाव- तळेगाव, पाटणा, उंबरखेड, धरणगाव-
नांदेड, एरंडोल- कासोदा, रवंजे बु., जामनरे- नेरी बु., जळगाव- विदगांव,
मुक्ताईनगर- अंतुर्ली, बेलसवाडी, चिखली, पाचोरा- पिंपळगांव (हरेश्वर), बाळद,
नांद्रा, रावेर- खिर्डी, पाल, चिनावल, यावल- किनगांव बु., नायगांव, बामणोद, वरणगाव
नगरपरिषद- वरणगाव, जळगाव शहर- हरिविठ्ठल नगर, सुभाष चौक, बळीराम पेठ, सिंधी कॉलनी,
रथ चौक, आणि विविध कॉलन्यांमध्ये भरणारे आठवडे बाजार इतर दिवशी भरविण्यात यावेत
असेही डॉ. ढाकणे यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment