Thursday, 4 April 2019

लोकसभा निवडणूकीसाठी शेवटच्या दिवशी जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 15 उमेदवारांचे 22 अर्ज तर रावेरसाठी 12 उमेदवारांचे 17 अर्ज दाखल



            जळगाव, दि. 04 :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी 03- जळगाव लोकसभा मतदार संघासाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी  (4 एप्रिल)  15 उमेदवारांनी 22 अर्ज दाखल केले आहेत. तर 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी 12 उमेदवारांनी 17 अर्ज दाखल केले आहेत.
            03- जळगाव लोकसभा मतदार संघासाठी आज बहुजन मुक्ती पार्टीकडून श्री. ईश्वर दयाराम मोरे यांनी    3 अर्ज, श्री. सुभाष शिवलाल खैरनार, श्री. संचेती रुपेश पारसमल, श्री. अनंत प्रभाकर महाजन, गनीशाह इस्हाक शाह, संत श्री. बाबा महाहंसजी महाराज पाटील यांनी प्रत्येकी एक अर्ज तर श्री. ओंकार चेनसिंग जाधव यांनी 2 अर्ज अपक्ष म्हणून दाखल केले आहेत.  इंडियन युनियन मुस्लीम लीगकडून रऊफ युसुफ शेख यांनी 2 अर्ज,  वंचित बहुजन आघाडीकडून श्रीमती. अंजली रत्नाकर बाविस्कर यांनी 2 अर्ज, बहुजन समाज पार्टीकडून राहुल नारायण बनसोडे, भारतीय जनता पार्टीकडून श्री. उन्मेश भैय्यासाहेब पाटील यांनी 2 अर्ज तर सौ. संपदा उन्मेश पाटील यांनी 1 अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रीय जनशक्ती पार्टीकडून (सेक्युलर) श्री. शरद गोरख भामरे (सुतार), महाराष्ट्र क्रांती सेनाकडून श्रीमती. वंदना प्रभाकर पाटील, भारतीय प्रजा सुराज्य पक्षाकडून श्री. प्रदिप भिमराव मोतीराया तसेच हिंदूस्थान निर्माण दलकडून संत श्री बाबा महाहंसजी महाराज पाटील यांनी प्रत्येकी एक अर्ज जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेकडे दाखल केले आहेत. 
            तर 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी आज इंडियन युनियन मुस्लिम लीगकडून इम्रान रऊफ खान व   रोशन आरा सादीक अली. अली यांनी प्रत्येकी 1 अर्ज दाखल केला आहे. तर इम्रान रऊफ खान, तंवर विजय जगन, सुनिल पंडित पाटील, रविंद्र दंगल पवार यांनी प्रत्येकी 1 तर ज्ञानेश्वर दिवाकर वाणी (फोटोग्राफर)- यांनी अपक्ष म्हणून 4 अर्ज दाखल केले आहे. त्याच बरोबर आंबेडकराईट पाटी ऑफ इंडियाकडून अडकमोल रोहीदास रमेश, वंचित बहुजन आघाडीकडून नितीन प्रल्हाद कांडेलकर यांनी 2 अर्ज, राष्ट्रीय आम जन सेवा पार्टीकडून अजित नामदार तडवी, बहुजन समाज पार्टीकडून योगेंद्र विठ्ठल कोलते, हिंदूस्थान जनता पार्टीकडून मधुकर सोपान पाटील तर बहुजन मुक्ती पार्टीकडून गौरव दामोदर सुरवाडे यांनी प्रत्येकी एक अर्ज अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे दाखल केले आहेत.
0000

No comments:

Post a Comment