जळगाव लोकसभा मतदार संघात 14 तर
रावेरमध्ये 12 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात
•जळगाव लोकसभा मतदार संघातून 5 तर रावेरमधून 4 उमेदवारांची निवडणूकीतून
माघार
जळगाव,
दि. 8:- सतराव्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या
उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 03-जळगाव लोकसभा मतदार संघातून
पाच उमेदवारांनी तर 04-रावेर लोकसभा मतदार
संघातून चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता जळगाव
लोकसभा मतदार संघात 14 तर रावेर लोकसभा मतदार संघात 12 उमेदवार निवडणूकीच्या
रिंगणात राहिले आहेत.
03-जळगाव लोकसभा मतदार
संघासाठी निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवार (कंसात निशाणी)
श्री. उन्मेश भैय्यासाहेब पाटील-भारतीय जनता पार्टी, (कमळ)
श्री.गुलाबराव बाबुराव देवकर- राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी, (घडयाळ)
श्री. राहुल नारायण बनसोडे-बहुजन समाज पार्टी, (हत्ती)
श्रीमती. अंजली रत्नाकर बाविस्कर- वंचित बहुजन आघाडी, (कप आणि बशी)
श्री. ईश्वर दयाराम मोरे (माजी सैनिक)-बहुजन मुक्ती पार्टी, (खाट)
श्री. मोहन शंकर बिऱ्हाडे-राष्ट्रीय समाजवादी पक्ष (सेक्युलर) (बॅटरी टॉर्च)
श्री. शरद गोरख भामरे (सुतार)-राष्ट्रीय जनशक्ती पार्टी (सेक्युलर), (नारळाची
बाग)
संत श्री बाबा महाहंसजी महाराज पाटील-हिंदुस्थान निर्माण दल, (पाण्याची टाकी)
श्री. अनंत प्रभाकर महाजन, अपक्ष (फुलकोबी)
श्री. ओंकार आबा चेनसिंग जाधव, अपक्ष (शिट्टी)
श्री. मुकेश राजेश कुरील, अपक्ष (संगणक)
श्री. ललीत (बंटी) गौरीशंकर शर्मा, अपक्ष, (ऊस शेतकरी)
श्री. सुभाष शिवलाल खैरनार, अपक्ष (चावी)
श्री. संचेती रुपेश पारसमल, अपक्ष (कपाट) हे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात
आहे.
03-जळगाव लोकसभा मतदार
संघातून उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवार
श्री. सतीश भास्करराव
पाटील, गनीशाह इस्हाक शाह, श्री. प्रदिप भिमराव मोतीराया, श्रीमती. वंदना प्रभाकर
पाटील, रऊफ युसुफ शेख यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे.
04-रावेर लोकसभा मतदार
संघासाठी निवडणूकीच्या रिंगणातील उमेदवार (कंसात निशाणी)
डॉ. उल्हास वासुदेव पाटील-इंडियन नॅशनल कॉग्रेस, (हात)
श्रीमती रक्षा निखिल खडसे-भारतीय जनता पार्टी, (कमळ)
डॉ. योगेंद्र विठ्ठल कोलते-बहुजन समाज पार्टी, (हत्ती)
अजित नामदार तडवी-राष्ट्रीय आम जनसेवा पार्टी, (दुरध्वनी)
अडकमोल रोहीदास रमेश-आंबेडकराईट पाटी ऑफ इंडिया, (कोट)
नितीन प्रल्हाद कांडेलकर-वंचित बहुजन आघाडी, (कप आणि बशी)
मधुकर सोपान पाटील-हिंदूस्थान जनता पार्टी, (दुरदर्शन)
रोशन आरा सादीक अली-इंडियन युनियन मुस्लिम लीग, (गॅस सिलेंडर)
गौरव दामोदर सुरवाडे, अपक्ष,
(खाट)
तंवर विजय जगन, अपक्ष (बॅट)
नजमीन शेख रमजान, अपक्ष (झगा)
डी. डी. वाणी
(फोटोग्राफर), अपक्ष (कॅमेरा) हे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहे.
04-रावेर लोकसभा मतदार
संघातून उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवार
सर्वश्री. रविंद्र दंगल
पवार, सुनिल पंडित पाटील, सुनिल संपत जोशी, इम्रान रऊफ खान यांनी आपले उमेदवारी
अर्ज मागे घेतले आहे.
जळगाव लोकसभा मतदार
संघाच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज
मागे घेण्याच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदार
संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे तर रावेर लोकसभा मतदार
संघातील उमेदवारांनी अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक
निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे आपली उमेदवारी मागे घेत असल्याचे अर्ज
सादर केले.
000000
No comments:
Post a Comment