जळगाव, दि. 10:- जळगाव केंद्रावर शासकीय सहकार व
लेखा पदविका (जी.डी.सी. ॲड ए.) परिक्षा व सहकारी गृह निर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र
(सी.एच.एम) परिक्षा दि. 23 ते 25 मे,2019 रोजी घेण्यात येणार होती.
मात्र
लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2019 चे अनुषंगाने जी.डी.सी.अँड ए. व सी.एच.एम. परिक्षा
मे, 2019 च्या तारखांमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आलेला असुन सदर परीक्षा दि. 27 मे (सोमवार), दि. 28 मे (मंगळवार) व (बुधवार)
दि. 29 मे 2019 रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी देण्यात आलेल्या सकाळी 10 ते 1 आणि
दुपारी 2 ते 5 यावेळेत तसेच दिलेल्या तारखे नुसार विषय ठेवण्यात आले आहेत. तसेच परिक्षेच्या तारखांमधील बदलाबाबत सर्व परिक्षार्थींनी
नोंद घ्यावी, असे आवाहन मेघराज राठोड, जिल्हा
उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000
No comments:
Post a Comment