जळगाव, दि. 03 - लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज सादर करण्याच्या सातव्या दिवशी (3 एप्रिल) 03-जळगाव लोकसभा मतदार संघासाठी आज नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीकडून श्री. गुलाबराव बाबुराव देवकर यांनी तर श्री. मुकेश राजेश कुरील व सतीश भास्करराव पाटील यांनी अपक्ष म्हणून जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
तर 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी आज नजमीन शेख रमजान व सुनिल संपत जोशी यांनी अपक्ष तर राष्ट्रीय आम जनसेवा पार्टीकडून अजित नामदार तडवी, इंडियन युनियन मुस्लिम लीगकडून रोशन आरा सादीक अली आणि बहुजन समाज पार्टीकडून योगेंद्र विठ्ठल कोलते यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे पाच उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
03-जळगाव लोकसभा मतदार संघात आजपर्यंत नऊ उमेदवारांनी बारा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर 04-रावेर लोकसभा मतदार संघात सात उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघासाठी 63 उमेदवारांनी 150 अर्ज नेले आहे. तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी 36 उमेदवारांनी 93 अर्ज नेले असल्याची माहिती निवडणूक शाखेमार्फत देण्यात आली.
000
No comments:
Post a Comment