जळगाव, दि. 20 - जिल्ह्यातील 03-जळगाव
व 04-रावेर लोकसभा मतदार संघासाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून या
दोन्ही मतदार संघाची मतमोजणी गुरुवार दिनांक 23 मे 2019 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे गोदाम क्रमांक 16 व 17, एमआयडीसी एरिया, जळगाव
येथे सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी
डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील 03-जळगाव व 04-रावेर
लोकसभा मतदार संघातील सर्व उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी, मतमोजणी प्रतिनिधी व
राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही डॉ. ढाकणे यांनी
केले आहे.
00000
No comments:
Post a Comment