जळगाव, दि. 10:- बारावी विज्ञान शाखेत
शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणांचा निपटारा
करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी
समितीमार्फत दि. 10 एप्रिल ते 15 जून -2019 दरम्यान विशेष मोहिम राबविण्यात येईल, असे
जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जळगावतर्फे कळविले आहे.
बारावी
विज्ञान शाखेच्या 2018-2019 मधील प्रलबिंत प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी ही विशेष
मोहिम आहे. विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव संबधित महाविद्यालयातर्फे
समिती कार्यालयात प्राप्त झालेले आहेत. मात्र ज्या अर्जदारांना समितीकडून त्रुटी कळविल्या
आहेत. अशा विद्यार्थ्यांनी दि. 10 एप्रिल ते 15 जून -2019 दरम्यान कार्यालयात त्रुटी
पुर्तता करावी जे अर्जदार, विद्यार्थी त्रुटी पुर्तता करणार नाहीत त्याचे अर्ज नियमानुसार
निकाली काढण्यात येतील, असे समितीकडून कळविण्यात आले आहे.
संपर्कासाठी
समितीचा पत्ता :- जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन, दुसरा मजला, मायादेवी मंदिरासमोर, महाबळ रोड, जळगाव असा आहे.
असे
आवाहन उपायक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समीती, जळगाव यांनी एका प्रसिद्धी
पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
0 0 0
No comments:
Post a Comment