जळगाव (जिमाका) दि. 5 :- राज्यातील अल्पसंख्यांक समाजातील तरुणांकरीता पोलीस शिपाई भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रम शासनातर्फे दरवर्षी राबविण्यात येत असून सन 2019-2020 वर्षासाठी राज्यात सदरचे पशिक्षण देण्याबाबत इच्छूक प्रशिक्षण संस्थांनी परिपूर्ण भरलेले प्रस्ताव दिनांक 13 ऑगस्टपर्यंत सादर करावेत.
प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हानिहाय निवडलेल्या 100 प्रशिक्षणार्थींना पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षेसाठी प्रशिक्षण दिले जाईल, या प्रशिक्षणात प्रामुख्यांने अंकगणित, सामान्यज्ञान, चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी ,मराठी भाषा व शारिरीक क्षमता या विषयाचे प्रशिक्षण देवून पोलीस शिपाई भरती परीक्षेसाठी त्यांची तयारी करून घेण्यात येईल,
प्रशिक्षण संस्थांच्या निवडीसाठीचे निकष:-
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शिफारस केलेल्या नोंदणीकृत शैक्षणिक संस्था / प्रशिक्षण संस्था असावी आणि संस्थेस प्रशिक्षण विषयक कार्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक, संस्थेकडे प्रशिक्षणार्थींना मराठी भाषा, सामान्य ज्ञान, बुध्दीमत्ता आणि शारिरिक क्षमता या विषयाचे प्रशिक्षण देण्यासाठी अनुभवी प्राध्यापक/प्रशिक्षक असणे, वर्ग खोल्या (50 प्रशिक्षणार्थींसाठी एक या प्रमाणे) उपलब्ध असणे, ग्रंथालय, वाचनालय, स्वच्छतागृहे आणि खेळांचं मैदान इत्यादि सुविधा उपलब्ध असणे आवश्यक राहिल.
प्रशिक्षण संस्थांना देय प्रशिक्षण शुल्क
निवडलेल्या प्रशिक्षण संस्थेस प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यातकरीता सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी भाषा आणि शारिरिक क्षमता हे विषय शिकविण्यसाठी दोन प्रशिक्षकांसाठी प्रतिमहिना रुपये 30,000 प्रमाणे दोन महिन्यासाठी रूपये 60,000 एवढे मानधन देण्यात येईल. निवडलेल्या प्रशिक्षण सस्थेस प्रशिक्षणार्थींना चाचन साहित्य आणि प्रशासकीय बाबींसाठी संस्थेस प्रत्येक प्रशिक्षणार्थी रुपये 300 प्रमाणे अनुदान देण्यात येईल. निवडलेल्या प्रशिक्षणाथीस प्रशिक्षणादरम्यान चहापान व अल्पोपहार देण्यासाठी होणाऱ्या खर्चापोटी रुपये 15 प्रतिदिन प्रति प्रशिक्षणार्थी एवढे अनुदान प्रशिक्षण संस्थेस देण्यात येईल. गणवेश साहित्यासाठी (गणवेश, बुट, मोजे, बनियन इत्यादि) प्रत्येक प्रशिक्षणार्थीस रुपये 1000 एवढे एकरकमी अनुदान देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत
ईच्छूक संस्थांनी आपले अर्ज संस्थेच्या लेटरहेडवर टंकलिखीत करून जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावेत. अर्जासोबत नोंदणीचा दाखला, संस्थेची नियमावली, शैक्षणिक/प्रशिक्षण विषयक कामाचा अनुभव संस्थेकडे असावा, अनुभवी प्राध्यापक/प्रशिक्षक यांची सविस्तर माहिती इ. कागदपत्रांच्या प्रति जोडाव्यात, संस्थांनी आपले अर्ज सीलबंद लिफाफामधूनच जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावेत. लिफाफ्यावर वरच्या बाजूस ठळक अक्षरात पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज असा उल्लेख करावा., इच्छूक संस्थांनी आापले अर्ज जिल्हाधिकारी यांचेकडे दिनांक 13 ऑगस्ट, 2019 पर्यंत सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सादर करावेत. जिल्हाधिकारी, निवडलेल्या प्रशिक्षण संस्थेस प्रशिक्षणार्थीची यादी उपलब्ध करून देतील अशा प्रशिक्षणार्थीचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी यांनी विनिर्दिष्ट केलेल्या तारखेपासून सुरू करणे, निवडलेल्या संस्थेंवर बंधनकारक राहिल. अंतिम निवड झालेल्या संस्थांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात रुपये 100 च्या अन्यायिक मुद्रांक पेपरवर विहित नमुन्यामध्ये करारनामा करावा लागेल. आणि याबाबतीतील सर्व अधिकार अल्पसंख्यांक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई याचेकडे असतील, याची सर्व संबंधित ईच्छुक संस्थांनी नोंद घ्यावी. असे अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव श्री. वामन कमद यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
00000

No comments:
Post a Comment