Saturday, 3 August 2019

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली रास्ट्रीय जंतनाशक टास्क फोरम समन्वय समितीची बैठक संपन्न




जळगाव ,दि.03, राष्ट्रीय जंतनाशक टास्क फोरम समन्वय समितीची बैठक आज दिनांक 03 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात संपन्न झाली. त्यावेळी  जिल्हा शल्य शल्य चिकित्क एन.एस.चव्हाण   यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेसंदर्भातील आरोग्य विभागाने मोहिमेदरम्यान करावयाची कामे आणि उद्देश याबाबतची माहिती  विस्तृतपणे  माहिती सादर केली.
 याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक एन.एस.चव्हाण, सामान्य रुग्णालयाची निवासी आरोग्य अधिकारी  डॉ.विजय जयकर,जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.डी.एस.पाटोडे,सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद पांढरे, डॉ.मनिषा उगले,महिला बाल विकास अधिकारी विजराज पांगारे, जिल्हा परिषदेच्या महिला बाल विकास अधिकारी एस.आर.गिंधेवार,आरोग्य विभागाचे सरला विजय पाटील,अर्चना धिमते, पोलीस निरीक्षक एस.एस.पठाण,शिक्षण विस्तार अधिकारी रमेश शिर्के, श्रीमती व्ही.एस.सावडेकर आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी बैठकीत बोलताना पुढे सांगितले की,जंतनाशक अभियान राबविताना सर्वसमावेशक कार्यक्रम राबवून जंतनाशकाच्या गोळयांची कमतरता भासणार नाही,वेळेत सर्व गरजूंपर्यंत गोळ्या पोहचतील याची काळजी घेवून जंतनाशक मोहिम राबविताना सामाजिक संयमसेवी संस्था, व नागरिकांची मदत घ्यावी .जेणेकरून जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केलेल्या 1 ते 14 वर्ष वयोगटातील किमान 241 दशलक्ष (68 टक्के) मुले असून त्यातील 28 टक्के बालकांना कृमी दोष होण्याची भिती आपण आपल्या जिल्हयातून घालविण्यास मदत होईल असेही शेवटी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले.
                                                        ****

No comments:

Post a Comment