जळगाव.दि.08 :- नाशिक विभागाचे पुरवठा उपायुक्त प्रविण पुरी यांच्या
अध्यक्षतेखाली चाळीसगाव तहसिल कार्यालयात पंडीत दिनदयाल उपाध्याय अभियान योजनेच्या
अनुषंगाने पुरवठा विभाग व आगामी विधानसभा निवडूकीसंदर्भात संभंदित
यंत्रणेसोबत बैठक पार पडली.
याप्रंसगी चाळीसगाव महसल उप विभागाचे उप
विभागीय अधिकारी शरद पवार, तहसिलदार अमोल मोरे, नायब तहसिलदार भालेराव, पुरवठा
तपासणी अधिकारी आर.आर.ढोले, गोदाम व्यवस्थापक एस.बी.निकुंभ, पुरवठा विभागातील सर्व
कर्मचारी, भडगाव,पाचोरा,चाळीसगाव येथील निवडणूक नायब तहसिलदार व तत्संबंधी
कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.
उपायुक्त पुरी यांनी पुरवठा संदर्भात
तालुक्याचा अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजना इष्टांक , इष्टांकापोटी 15 जुलै ते
7 ऑगस्ट दरम्यान प्राप्त अर्जांची संख्या ,अंत्योदय आर.सी.आणि पी.एच.एच
लाभार्थ्यांची संख्या, प्राप्त अर्जांपैकी डाटा एंट्री झालेल्या अर्जांची संख्या
,इष्टांकापोटी केलेल्या कामकाजाची टक्केवारी, अन्न सुरक्षा योजनेतील
लाभार्थ्यांपैकी किती कुटुंबांना अभियाकालावधीत गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात आली
,अपात्र आभार्थी वगणेबाबत केलेली कार्यवाही ,माहे ऑगस्ट 2019 मध्ये अन्न सुरक्षा
सप्ताहात करण्यात येत असलेली कार्यवाही ,माहे ऑगस्ट 2019 चा ऑनलाईन ट्रॉन्झॅक्शनचा
आढावा घेतला घेवून या अभियांतर्गत कार्यवाही बिनचूकपणे करून कोणावरही अन्याय होणार
नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी
आढावा बैठकीस उपस्थितांना दिल्यात.
उपायुक्त प्रविण पुरी यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदार याद्यांचा आढावा घेतांना नवीन मतदार
नोदणीसाठी दिनांक 1 जानेवारी 2019 हा
अर्हता दिनांकावर आधारीत दिनांक 1 जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्षे पुर्ण
केलेल्या नवमातदारांचे फॉर्म क्रमांक 6 भरून घेवून महिला मतदारांची संख्या
वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या. फॉर्म क्रमांक 6 भरून नवमतदार नोंदणी करीत
असतांनाच मृत मतदारांचा शोध घेवून त्यांच्या वारसांकडून फॉर्म क्रमांक 7 भरून
घेवून मृत मतदारांची नावे मतदार याद्यामधून वगळण्यात यावीत. नवीन त्यातच
पहिल्यांदाच मतदार होण्यास पात्र ठरत असलेल्या मतदारांची संख्या वाढविण्यासाठी
गावपाळीवर तलाठी,ग्रामसेवक, बी.एल.ओ तसेच
स्वयंसेवी संस्थांच्या बैठका घेवून त्यांच्या माध्यमातून नवमातदारांना मतदार बनून मतदार
असण्याचे महत्व व मतदान करून राष्ट्रीय
कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन करण्याच्या सुचना
द्याव्यात असेही उपायुक्त प्रविण पुरी यांनी उपस्थितांना सांगितले.
00000
No comments:
Post a Comment