Wednesday, 21 August 2019

रावेरचा आठवडे बाजार 30 ऐवजी 29 ऑगस्टला भरवावा जिल्हादंडाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांचे निर्देश

     जळगाव, दि. 21 - रावेर नगरपालिका हद्दीतील आठवडे बाजार हा दर शुक्रवारी भरतो. तथापि, शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी पोळा हा सण असल्याने या दिवशीचा आठवडे बाजार गुरुवा, 29 ऑगस्ट, रोजी भरविणेबाबत मुख्याधिकारी, नगरपालिका रावेर यांनी विनंती केली आहे.
     त्याअर्थी, मुंबई मार्केट ॲण्ड फेअर्स ॲक्ट 1862 चे कलम 5 (अ) व (क) अनवये जिल्हादंडाधिकारी या नात्याने दिलेल्या अधिकाराचा वापर करून रावेर नगरपालिका हद्दीतील शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट, 2019 रोजीचा आठवडे बाजार गुरूवार ‍दिनांक 29 ऑगस्ट, 2019 रोजी भरवावा, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.
                                                                            000

No comments:

Post a Comment