Tuesday, 6 August 2019

परिवहन विभागाचा 8 ऑगस्ट रोजीचा भुसावळ तालुका मासिक दौरा रद्द


        जळगाव, दि. 6-  उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगावमार्फत तालुकानिहाय घेण्यात येणाऱ्या दौऱ्यानुसार दिनांक 8 ऑगस्ट, 2019 रोजी भुसावळ येथे नियोजित दौरा होता.
            तथापि, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिनांक 8 ऑगस्टच्या भुसावळ येथील नियोजित दौऱ्यामुळे त्यादिवशी शासकीय विश्रामगृह उपलब्ध होवू शकणार नसल्याने 8 ऑगस्टचा मासिक दौरा रद्द करण्यात आलेला आहे.
            कृपया याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन किरण मोरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00000

No comments:

Post a Comment