जळगाव,
दि. 26- औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर या संस्थेत सन 2019-20 या शैक्षणिक
सत्रासाठी विविध व्यवसायाकरीता शिल्पनिदेशकांची तासिका तत्वावर मानधनावर भरती
करावयाची आहे. याकरीता इच्छूक उमेदवारांनी
30 ऑगस्ट, 2019 पर्यत प्राचार्य, आद्योगिक प्रशिक्षण संथा, जामनेर यांचे नावे अर्ज
करावेत. असे आवाहन एम. एस. राजपूत, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामनेर,
जि.जळगाव यांनी केले आहे.
शिल्पनिदेशक
या पदांतर्गत जोडारी-1 पद,कातारी -1 पद, यांत्रिक मोटर गाडी -1 पद, यांत्रिक डिझेल
मेकॅनिक-2 पदे, विजतंत्री -1 पद आणि तारतंत्री-2 पदे या सर्व पदांसाठी शैक्षणिक
पात्रता संबंधित व्यवसायातील आय.टी.आय/एनसीटीव्हीटी उत्तीर्ण/सीटीआय उत्तीर्ण तसेच
3 वर्षे संबंधित व्यवसाय अभ्यासक्रम शिकविण्याचा अनुभव किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रीकल
पदवी/पदविका धारकांसाठी 1 वर्ष शिकविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. तर शिल्पनिदेशक
एम्प्लायबिटी स्किल-1 पद, शैक्षणिक पात्रता मान्यतापात्र विद्यापीठाची एमबीए/बीबीए
पदवी. या पदावर प्रत्यक्ष शिकविण्याचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
निदेशक(गणित)
1 पद, शैक्षणिक अर्हता-बी.एस.सी गणित किंवा मेकॅनिकल पदवी/पदविका आवश्यक. आय.एम.सी.साठी (सेवाकरारावर) शिल्पनिदेशक
अंतर्गत संधाता-1 पद, ड्रेस मेकींग- 1 पद, कोपा- 2 पदे. या सर्व पदांसाठी
आय.टी.आय/एनसीटीव्हीटी उत्तीर्ण/सीटीआय उत्तीर्ण
तसेच 3 वर्षे शिकविण्याचा अनुभव किंवा मेकॅनिकल/कॉम्युटर पदवी /पदविका
धारकांसाठी 1 वर्ष अनुभव आवश्यक आहे.
तरी इच्छूक उमंदवारांनी त्यांचे
आवश्यक ते सर्व मूळ/छायांकित कागदपत्रे, अर्जासह 4 सप्टेंबर, 2019 रोजी स्वखर्चाने
उपस्थित रहावे. असे आवाहन प्राचार्य श्री. राजपूत यांनी केले आहे.
000
No comments:
Post a Comment