Friday, 23 August 2019

स्वयंसहायता बचत गटांना मोफत कापडी पिशव्यांचे वाटप


       जळगाव, दि. 23 - महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व महिला विकास महामंडळ (माविम) जिल्हा कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध योजनेंतर्गत महिला विकास महामंडळामार्फत स्थापित केलेल्या महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांकडून कापडी पिशव्या शिवून घेण्यात आल्या आहेत. या पिशव्यांचे जळगाव शहर महापालिकेच्या महापौर श्रीमती सिमाताई भोळे यांच्या हस्ते नागरी उपजिविका अभियांतर्गत स्थापित महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांना विनामुल्य वाटप करण्यात आले व महिलांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे.
             याप्रसंगी नगरसेवक श्री. कापसे, श्रीमती प्रतिभा पाटील, श्रीमती बाविस्कर, व माजी नगरसेवक श्रीमती कापसे यांच्यासह महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे फिल्ड अधिकारी वावडे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. शेख अतिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी लेखाधिकारी विजय स्वामी, सहाय्यक संनियंत्रण अधिकारी युवराज पाटील, दिपक वाणी तसेच स्वप्नपूर्ती लोकसंचलित साधन केंद्राच्या ‍ सहयोगिनी उपस्थित होते. 
000

No comments:

Post a Comment