Tuesday, 20 August 2019

प्रधानमंत्री बाल शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

     जळगाव, दिनांक 20 - केंद्र शासनाने वैयक्तिक वा संस्थेत काम करणाऱ्या मुलांकरीता पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये बाल शक्ती पुरस्कार : ज्या मुलाने अभिनव कार्य वेगवेगळ्या क्षेत्रात केलेले असेल जसे नवीन कल्पना, शैक्षणिक, खेळ, आर्ट व कल्चर, सामाजिक सेवा व शौर्य यामध्ये उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या मुलांना बाल शक्ती पुरस्काराने सन्मानीत केले जाते.
     बाल कल्याण पुरस्कार : ज्या मुलाने मुलांच्या विकासामध्ये उत्तम सेवा केली असेल किंवा मुलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उत्तम कामकाज केले असेल किंवा मुलांना बाल कल्याण पुरस्काराने सन्मानीत केले जाते. अशा मुलांची नोंद सबंधित संस्थेकडे अथवा वैयक्तिक कोणाकडे असल्यास त्याचे नाव सविस्तर माहितीसह 31 ऑगस्ट, 2019 पुर्वी उपसंचालक, बुनकर सेवा केंद्र, मुंबई यांचेकडे पाठवावी.
     अधिक माहितीसाठी www.nca-wcd.nic.in या वेबसाईटवर जावून ऑनलाईन नामनिर्देशन अर्ज 31 ऑगस्ट, 2019 पुर्वी सादर करावे. अधिक माहितीकरीता उपसंचालक, बुनकर सेवा केंद्र, मुंबई, 15-अे, परमानंद मार्ग, मुंबई-400004, दुरध्वनी क्रंमाक-022/23691238 व 23109923, Email :- dirwzwscmum@yahoo.in यावर संपर्क साधण्याचे आवाहन प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई यांनी केले आहे.
                                                                    000

No comments:

Post a Comment