Sunday, 11 August 2019

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या शासन निर्णयामध्ये 14 ऑगस्टपर्यंत सुधारणा सुचविण्याचे आवाहन

     जळगाव. दि. 11 - शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), उत्कृष्ट क्रीडा संघटक/कार्यकर्ते व जिजामाता पुरस्काराचा दि. 16 ऑक्टोबर, 2017, दि. 2 डिसेंबर, 2017 व दि. 24 ऑक्टोबर, 2018 च्या शासन निर्णयान्वये (सदरचे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.) विहित केलेल्या निकषांचा अभ्यास करुन निकष/नियमांमध्ये सुधारणा सुचविण्यासाठी शासनामार्फत समितीचे गठण करण्यात आलेले आहे. या समितीने उपरोक्त शासन निर्णयान्वये विहित केलेल्या निकषांचा/नियमांचा अभ्यास करुन त्यात करावयाच्या सुधारणा संदर्भातला समितीचा अहवाल शासनास सादर करावयाचा आहे.
     त्यानुसार सर्व खेळाडू, दिव्यांग खेळाडू, साहसी क्रीडा प्रकारातील व्यक्ती, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक/कार्यकर्ते, क्रीडा प्रेमी, विविध खेळाच्या एकविध खेळ राज्य संघटनाचे पदाधिकारी यांना कळविण्यात येते की, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराच्या उपरोक्त शासन निर्णयामध्ये काही सुधारणा/बदल, निकष/ नियमांमध्ये काही सुधारणा सुचवावयाच्या असल्यास आपल्या सुचना/बदलाबाबतच्या काही निकष/सुधारणांचे आपले अभिप्राय 14 ऑगस्ट, 2019 पर्यंत dsysdesk१४@gmail.com किंवा  desk१४.dsys-mh@gov.in  या मेलवर आपल्या सुचना पाठविण्यात याव्यात. असे आवाहन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत करण्यात आलेले आहे.
                                                                     ०००

No comments:

Post a Comment