Friday, 16 August 2019

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची पूर्वतयारी कर्मचा-यांना माहिती भरण्याचे प्रशिक्षण संपन्न


                चाळीसगाव दि. 16 :- आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 ची पुर्वतयारीच्या  अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यातील  सर्व विभागांचे विभाग प्रमुख  अधिकारी व कर्मचारी यांची माहिती PPMS  प्रणालीत भरण्याचे प्रशिक्षण तहसिलदार अमोल मोरे, यांच्या अध्यक्षतेखाली  चाळीसगाव येथील हंस चित्रपट गृहात प्रशिक्षण संपन्न झाले.
           सदर प्रशिक्षणात तहसिलदार अमोल मोरे, निवासी नायब तहलिसदार नानासाहेब आगळे, यांनी  निवडणूकीच्या कामासाठी  कार्यालयातील वर्ग -1 ते 4 संवर्गातील सर्व  अधिकारी – कर्मचाऱ्यांची माहिती भरणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले.  आपल्या कार्यालयाचे संगणक संकेतांक  व कार्यालयाचा पासवर्ड  लोड करून ऑनलाईन पध्दतीने  https://mahaelection.gov.in/PPMS/login  यास संकेत स्थळावर  माहिती भरणे आवश्यक आहे.  प्रशिक्षणासाठी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी  व कर्मचारी उपस्थित होते.
         कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येवू नये, आपल्या अडचणीमुळे निवडणूक प्रक्रियेत बाधा येवू नये यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली माहिती अचूक भरावी  तहसिलदार अमोल मोरे यांनी  सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थींना  सांगितले.
                                                                    ******* 

No comments:

Post a Comment