जळगाव, दि.23 - महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ज. मसे. अभ्यंकर हे रविवार, दिनांक 25 ऑगस्ट, 2019
रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा
जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे.
रविवार, दिनांक 25 ऑगस्ट, 2019 रोजी
सकाळी 7.30 वाजता अंजनगाव, जि. अकोला
येथून भुसावळकडे प्रयाण. दुपारी 12.30
वाजता भुसावळ हायस्कूल, भुसावळ
दत्त नगर, जळगाव रोड, भुसावळ येथे आयोजित प्रेरणा कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण
समारंभास उपस्थिती. दुपारी 3.30 ते 4.30
वाजेदरम्यान शासकीय विश्रामगृह, भुसावळ येथे अल्पसंख्यांक समाजातील
प्रतिनिधींशी चर्चा. सायंकाळी
4.30 ते 7.30 वाजेदरम्यान राखीव. रात्री
7.40 वाजता भुसावळ येथून मुंबईकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment