Monday, 19 August 2019

सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी मुंबई व नागपूर येथे 23 ऑगस्ट रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन


            जळगाव, दि. 19 - केंद्र शासनाच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या आदेशानुसार संपूर्ण देशामधील संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये शुक्रवार, 23 ऑगस्ट, 2019 रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
            मुंबई व नागपूर येथे आयोजित या पेन्शन अदालतीकरीता महालेखाकार, मुंबई आणि नागपूर यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मुंबई येथील  पेन्शन अदालत शक्रवार, 23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते पूर्ण दिवस पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई येथे तर नागपूर येथील लोक अदालत सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत साई सभागृह, शंकर नगर, अंबाझरी रोड, नागपूर येथे होईल. या संदर्भातील अधिक माहितीचे परिपत्रक कोषागार कार्यालयात लावण्यात आलेले आहे.
          तरी सर्व संबंधितांनी याची नोंद घेवून अधिक माहितीसाठी  सर्व संबंधितांनी कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा. असे  आवाहन प्र. स. पंडित, जिल्हा कोषागार अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                              000

No comments:

Post a Comment