चाळीसगाव, दि. 15 - भारतीय स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन
दिनोत्सावानिमित्त येथील पोलीस परेड मैदान, चाळीसगाव येथे ध्वजारोहणाचा मुख्य
शासकीय समारंभ चाळीसगाव महसूल उप विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाला.
राष्ट्रगीत आनंदीबाई बंकट विद्यालयातील विद्यार्थिनींनी सादर केले.
ध्वजारोहणानंतर उप विभागीय अधिकारी श्री. शरद पवार यांना पोलीस तसेच
गृहरक्षक दलातर्फे मानवंदना देण्यात आली. राष्ट्रध्वज वंदन व संचलन समारंभानंतर उप
विभागीय अधिकारी शरद पवार यांनी सर्व उपस्थितीतांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या
शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी नगराध्यक्षा सौ.आशालता चव्हाण, उपनगरध्यक्षा सौ. आशाताई चव्हाण, पंचायत
समिती सभापती सौ. स्मितल बोरसे, प्रशासनाच्या
वतीने अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गोरे, पोलीस उप अधिक्षक उत्तम कडलग, तहसिलदार अमोल
मोरे, नगर पालिकेचे मुख्याधिकारी श्री. अतुल पाटील, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत
समिती सदस्य, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक, नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे
पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, विविध वृत्तपत्रांचे
प्रतिनिधी, छायाचित्रकार, विविध प्रसार वाहिन्यांचे प्रतिनिधी, प्राध्यापक तसेच उप
विभागीय कार्यालय, तहसिल कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, पोलीस प्रशासन, गृहरक्षक
दल आदि शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच
पंचक्रोशितील नागरिक मोठया संखेने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment