Friday, 23 August 2019

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 सप्टेंबर रोजी आयोजन


       जळगाव, दि. 23 - प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. तथापि, माहे सप्टेंबर, 2019 महिन्याच्या पहिला सोमवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस म्हणजेच मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2019 रोजी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली आहे.
             माहे सप्टेंबर, 2019 या महिन्याचा लोकशाही दिन मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे दुपारी 3.00 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
            जिल्ह्यातील ज्या नागरिकांना लोकशाही दिनात आपले तक्रारी अर्ज सादर  करावयाचे असतील त्यांनी मंगळवार, दिनांक 3 सप्टेंबर 2019 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे दुपारी 3.00 वाजेपर्यंत आपले तक्रारी अर्ज (न्याय प्रविष्ठ प्रकरणे वगळून) सादर करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:

Post a Comment