Tuesday, 20 August 2019

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा



      जळगाव, दि. 20 - येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज सद्भावना दिन साजरा करण्यात आला.   दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून साजरी करण्यात येते.  यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांना सद्भावनादिनाची शपथ दिली. यावेळी डॉ. ढाकणे यांनी दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
 याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, तहसीलदार मंदार कुलकर्णी यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                             000

No comments:

Post a Comment