जळगाव,
दि. 6 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगावमार्फत तालुकानिहाय घेण्यात
येणाऱ्या दौऱ्यानुसार दिनांक 22 ऑगस्ट, 2019 रोजी भुसावळ येथे नियोजित दौरा होता.
तथापि, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिनांक 23 ऑगस्ट रोजी भुसावळ
येथे नियोजित दौरा असल्यामुळे त्यादिवशी शासकीय विश्रामगृह उपलब्ध होवू शकणार
नाही.
याकरीता
22 ऑगस्ट, 2019 रोजीचा भुसावळ येथील मासिक
दौरा रद्द करण्यात आला आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. असे आवाहन उप
प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव श्री. श्याम लोही यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000
No comments:
Post a Comment