Friday, 9 August 2019

जैव वैद्यकीय अभियांत्रिकी विषयावर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात एक आठवड्याचे प्रशिक्षण संपन्न


        जळगाव.दि.09, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,जळगाव येथे  TEQIP-III  अंतर्गत  जैव वैद्यकीय अभियांत्रिकी  या विषयावरील  एका आठवड्याचे  प्रशिक्षण  संपन्न झाले. प्रशिक्षणाचे उद्घाटक शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव चे अधिष्टाता डॉ. बी.एस.खैरे  यांनी  प्रशिक्षणात डोळ्यांच्या विविध आजारा विषयी व त्यासाठी लागणारे संशोधन, साहित्य व त्याबाबतच्या विकासाबद्दल विस्तृत माहिती दिली.
          आजच्या स्पर्धात्मक युगात अभियांत्रिकी व इतर शाखांच्या ज्ञानाची योग्य सांगड घालून बहु शाखीय अभ्यासाच्या दृष्टीने त्याचा अंतर्भा व इलेक्टॉनिक्स व दूरसंदेशवहन विभागातील अभ्यासक्रमात करण्यात आल्याचे  इलेक्टॉनिक्स व संशोधन व विकास विभागाचे अधिष्टाता प्रा.डॉ देवेंद्र चौधरी यांनी सांगून वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांना उपकरणे हाताळतांना येणाऱ्या अडचणी व ती उपकरणे, यंत्रे यांचा वापर, सेवा व उपयोगिता अधिक सुकर पद्धतीने हाताळता यावीत यासाठी गेल्या 30 वर्षापासून संशोधन व विकास कार्यात सहभागी असल्याचे प्रा.डॉ. देवेंद्र चौधरी यांनी सांगितले.
               जैव वैद्यकीय अभियांत्रिकीमध्ये इइजी मॉनिटरींग सिस्टीम, पाम साईज ऑडिओमिटर, हियरिंग एड इत्यादि उपकरणांच्या विकास कार्यात सहभागी होवून योग्य पद्धतीने उपचार करण्यास हातभार लावलेला आहे. त्यासाठी डॉ.चौधरी यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध प्रसिद्ध केलेले आहेत. संशोधन केलेल्या विषयावर पेटंट घेतलेले आहेत. इलेक्टॉनिक्स विभागात इतर संबंधित साहित्यासोबत जैव वैद्यकीय साहित्याची  खरेदी, निर्लेखन व  त्यासंबंधातील त्रयस्थ तांत्रिक परिक्षण इ. संबंधित शासन मान्य कामकाज होत असल्याचे नमूद केले. तसेच इसीजी, इइजी इत्यादि संबंधी करण्यात येणाऱ्या संशोधनाबाबत डॉ.चौधरी यांनी उपस्थितांना अवगत केले.
                काळाची गरज व बदलती औद्योगिक समीकरणे लक्षात घेता अशा प्रकारचे प्रशिक्षणांचे भविष्यातही आयोजन करण्यात येईल असे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय,जळगाव  प्राचार्य प्रा.डॉ.रा.द. कोकाटे यांनी सांगितले  प्रशिक्षण सप्ताहात  सुत्रसंचालन श्रीमती एस.एम.पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा.डॉ. चौधरी, समन्वयक प्रा.डॉ. मोहनी तसेच अध्यापक व कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.
00000

No comments:

Post a Comment