जळगाव, दि. 16 - वर्षानुवर्षे विविध कारणाने प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या गोष्टी टाळण्यासाठी व आपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटवून घेण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या निर्देशनानुसार संपूर्ण देशात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन शनिवार, दि. 14 डिसेंबर, 2019 रोजी करण्यात आले आहे.
विधी व सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने एकाच दिवशी या राष्ट्रीय लोकअदालतीचा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश जी. ए. सानप यांच्या अध्यक्षतेखाली शुभारंभ होणार आहे. या लोक अदालतीस जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा वकील संघ, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांची उपस्थिती आणि सहकार्य लाभणार आहे.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये भुसंपादन, धनादेश अनादर, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युनसीपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित इतर खटले व खटला दाखलपूर्व प्रकरणे तसेच एकूण ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते. असे संपूर्ण खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. जळगाव येथील औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय तसेच ग्राहक तक्रार निवारण मंच येथील तडजोडयोग्य प्रकरणेदेखील त्या-त्या न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये आपसांत तडजोडीसाठी संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर खटले ठेवण्यात आलेले आहेत. तसेच राष्ट्रीय लोकअदालीमध्ये राष्ट्रीयकृत बँका, कंपन्या, यांचे प्रलंबित असलेल्या दिवाणी व फौजदारी खटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम वसूली होण्याची शक्यता आहे. वादपूर्व खटल्यांमध्ये बँका, कंपन्या, भ्रमणध्वनी कंपन्या, दुरध्वनी कार्यालय यांनी थकीत रक्कमेमध्ये सूट देण्याबाबत प्रस्तावित केलेले आहे.
तरी पक्षकारांनी आपली प्रकरणे तडजोडीने काढण्यासाठी 14 डिसेंबरच्या राष्ट्रीय लोकअदालतीत आपला सहभाग नोंदवून खटले त्वरीत निकालात काढून घेण्यसाठी पर्यायाने वेळ, पैसा यांची बचत करण्यासाठी लोकअदालतीचा लाभ घ्यावा. असे आवाहन सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, जळगाव श्री. कौ. हे. ठोंबरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000

No comments:
Post a Comment