जळगाव,
दि. 29 - महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत वैयक्तिक
कर्ज व्याज परतावा व गट कर्ज परतावा योजना कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. या
दोन्ही योजना बँकेमार्फत राबवण्यात येणार असून अर्जदाराला महामंडळाच्या वेब
पोर्टलवर नोदणी करणे आवश्यक आहे.
सदर
योजनेच्या अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास
महामंडळाच्या www.msobcfdc.org या वेबसाईटला भेट द्यावी. असे आवाहन जिल्हा
व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, जळगाव
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000
No comments:
Post a Comment