जळगाव, दि.
11 - महाराष्ट्र
शासन वित्त विभागांतर्गत विभागीय सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक
यांच्यामार्फत लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षणाचे
सत्र 23 डिसेंबर 2019 ते 27 फेबुवारी, 2020 दरम्यान एकूण 50 दिवसांचे आयोजित केले
आहे.
प्रशिक्षणासाठी 5 मोड्युलप्रमाणे
निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर
आणि नंदुरबार या जिल्हा कोषागार
कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी कोणत्याही इच्छूक कर्मचारी
यांना प्रवेश देण्यात येईल. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाच्या 24 जून
2015 च्या शासननिर्णयानुसार सर्व शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचारी यांना
प्रशिक्षण सक्तीचे केले आहे.
प्रशिक्षणासाठी संपूर्ण 50 दिवसांच्या
अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक आहे. तथापि, पुर्णवेळ पाठविणे शक्य नसल्यास
विशिष्ट मोड्युलसाठी प्रवेश घेण्याची अनुमती कर्मचारी यांना दिली जाईल. त्याअनुषंगाने
नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व
शासकीय कार्यालयीन प्रमुखांनी त्यांच्याकडील लिपीक वर्गीय कर्मचारी यांना
प्रशिक्षणासाठी पाठविण्याचे आवाहन सहाय्यक संचालक (प्रशिक्षण) लेखा व कोषागारे
नाशिक विभाग, नाशिक श्री. सु. प्र.
अहिरराव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्ये केले आहे.
000
No comments:
Post a Comment