Thursday, 21 November 2019

स्टेशन हेडक्वार्टरस भुसावळ येथे 15 डिसेंबर रोजी माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन


            जळगाव दि. 21 :- जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, विधवा पत्नी तसेच त्यांचे अवलंबित यांनी 15 डिसेंबर, 2019 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्या माजी सैनिकांच्या काही अडी-अडचणी, तक्रारी असतील अशांनी लेखी स्वरुपात स्टेशन सेल, स्टेशन हेडक्वार्टरस्, भुसावळ यांना पोस्टाने त्वरीत पाठवाव्यात. कार्यक्रमाच्या दिवशी भुसावळ येथे रेल्वे स्टेशन ते मिलीटरी स्टेशन भुसावळपर्यंत मोफत बस सेवा उपलब्ध राहील. सदर कार्यक्रमात विविध बाबींवर मार्गदर्शन होणार असून कार्यक्रमाची सांगता सस्नेह भोजनाने होईल. तरी जिल्ह्यातील सर्व वीर माता, वीर पिता, युद्ध विधवा, विधवा पत्नी व अवलंबित यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी 0257-2241414 (जिसैकका-जळगाव) किंवा 02582-220540 (स्टेशन हेडक्वार्टरस) या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वेय कळविले आहे.
                                                                   00000

No comments:

Post a Comment